प्रवरेत उद्योजकता वाढीसाठी प्रयत्न करणार
- डॉ. सुष्मिता विखे पाटील
शिव जयंती निमित्त मराठा उद्योजक परिवार संवाद कार्यक्रम
लोणी दि.२१ प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करून तळागाळातील लोकांना खऱ्या अर्थानं सन्मान दिला. हाच सन्मान प्रवरेतील उद्योजकांना देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. प्रवरा परिसरातील उद्योजकांना संवाद कौशल्य त्याचबरोबर विविध व्यावसायिक कौशल्य देण्यासाठी प्रवरा शैक्षणिक संकुल आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील हा विश्वास लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी दिला. प्रवरा परिसरातील मराठा उद्योजक परिवाराच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमांमध्ये उ संवाद साधतांना डॉ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी
प्रशांत आहेर, संजय विखे, कैलास तुरकणे ,गणपत भोसले ,विजय विखे ,कैलास तळोले ,निर्मळ सर ,विवेक लगड ,गणेश आहेर ,अनिल हेंगडे,नितीन विखे,दिघे,कपाटे, दिपक विखे,जगदीश निर्मळ, अभिषेक कोल्हे,पंकज जाधव, उदय विखे,गंगाराम धनवटे, अजय बोरणारे,कोबरने कांगुने,संदीप तांबे, बाबासाहेब तांबे ,सागर विखे ,सुमित विखे,ठोके,जाधव,आदीसह परिसरांतील उद्योजक परिवारांतील सदस्य उपस्थित होते. यावेळी संवाद साधतांना डॉ. सुष्मिता विखे पाटील म्हणाल्या की प्रवरा परिसराच्या माध्यमातून उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रवरा शैक्षणिक संकुल हे नोकरी करणारे विद्यार्थी नव्हे तर नोकरी देणारे विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहे. यासाठी प्रवरा बिल्डिंग हा आगळावेगळा उपक्रमही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला या माध्यमातून काही विद्यार्थ्यांनी आपल्या उद्योजकतेला ही सुरुवात केली आहे. परिसरातील उद्योजकांना नवनवीन तंत्रज्ञान देण्याबरोबरच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरु केले आहे. नवनवीन व्यवसाय प्रवरा परिसरामध्ये सुरू व्हावे यासाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही डॉ. विखे पाटील यांनी देतानाच प्रवरा शैक्षणिक संकुल आणि आपल्या उद्योजक परिवाराच्या माध्यमातून एकत्रित काम करुन परिसराची उद्योजकता ही देशपातळीवर पोहचण्यासाठी प्रयत्न करुन एक माॅडेल उभे कण्याचा मानस व्यक्त केला.
प्रारंभी उद्योजक महिलांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन आणि महाआरती करण्यात आली. यावेळी अर्णव ज्ञानेश्वर निबे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित पोवाडा सादर करत सर्वांचीच मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर निबे यांनी तर आभार निलेश घोलप यांनी मानले.


