भंडारदरा प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आज जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळी हंगामासाठी तीन आणि रब्बीसाठी एक आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
निळवंडे कालव्यांना १५जानेवारी पासून आवर्तन सोडण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.कालवे चार्याच्या समस्याबाबत अधिकारी व कॅनाॅल इन्सपेक्टरांनी अतिशय गांभीर्याने काम करून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीला खा.भाऊसाहेब वाकचौरे ,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील ,आ.डॉ किरण लहामटे ,आ.अमोल खताळ, आ.हेमंत ओगले यांच्यासह लाभक्षेत्रातील सहकारी संस्थाचे प्रतिनिधी शेतकरी उपस्थित होते.



